बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मागणी

Mainroad market
Mainroad marketesakal
Updated on

जुने नाशिक : मेनरोड, शालिमार मुख्य बाजारपेठ भर वेगात बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करत लगाम लावावी. यासाठी गाडगे महाराज पुतळा तसेच मेन रोड परिसरात पोलिस नियुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन नाशिक शहर काँग्रेस सेवादलातर्फे भद्रकाली पोलिसांना देण्यात आले.

Mainroad market
जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांचे राजकारण

त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळेस वाहनांना बाजारपेठेत प्रवेश नाकारण्यात यावा. यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांचा वचक निर्माण होण्यास मदत होईल. याशिवाय पूर्वीप्रमाणे गाडगे महाराज पुतळा येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, गस्त वाढवावी. असे झाल्यास बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागण्यास मदत होईल. तसेच बाजारपेठेत गर्दीची संधी साधत पर्स लांबविणे, मोबाईल पळविणे अशा विविध प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसेल. तसेच येथील वाहतूक कोंडी सुटण्यासदेखील मदत होईल. यासाठी पोलिसांची नियुक्ती आणि गस्त करणे आवश्यक असल्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून सेवादलाचे शहराध्‍यक्ष वसंत ठाकूर यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.

Mainroad market
रेल्वेस्थानकात तिकीट तपासणी जोमात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Three-Hour Rescue Drama Ends in Tragedy in Awahana-Khedi River Incident
NEET paper leak case CBI photo helped Nashik Police detain suspect quickly
NEET Paper Leak Controversy
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com