विजेची मागणी वाढताच महानिर्मितीकडून दुपटीने वीजनिर्मिती

As the demand for electricity increased, Mahanirmithi doubled its power generation
As the demand for electricity increased, Mahanirmithi doubled its power generatione-sakal

नाशिक : अतिवृष्टीच्या संकटामुळे काही दिवसांपासून राज्यात विजेच्या मागणीत घट झाल्याने महानिर्मितीलाही आपले वीज उत्पादन त्या प्रमाणात कमी करावे लागले होते. तथापि, आता उद्योगधंद्याचे चक्र गतिमान होऊ लागल्याने तीन-चार दिवसांपासून विजेची मागणी सरासरी सुमारे २१ हजार मेगावॉट इतकी वाढली आहे. या वाढीव मागणीची पूर्तता करण्यासाठी महानिर्मितीने तातडीचे योगदान देत १० ऑगस्टला सुमारे सात हजार १२९ मेगावॉट इतक्या लक्षणीय प्रमाणात वीजनिर्मिती साध्य केली.

'या' केंद्रांवर झाली लक्षणीय वीजनिर्मिती

कोराडी वीज केंद्र- एक हजार ८७२ मेगावॉट, खापरखेडा वीज केंद्र- एक हजार ११४ मेगावॉट, चंद्रपूर वीज केंद्र- एक हजार ८८४ मेगावॉट, भुसावळ वीज केंद्र- एक हजार ३१ मेगावॉट, परळी वीज केंद्र- ६५८ मेगावॉट, पारस वीज केंद्र- २३५ मेगावॉट व नाशिक वीज केंद्र- ३३५ मेगावॉट अशा प्रमाणात वीजनिर्मिती करण्यात आली. महानिर्मितीने तीन-चार दिवसांपासून शिखर मागणीत सरासरी सहा हजार ५०० ते सात हजार मेगावॉट इतकी वीजनिर्मिती साध्य करून आपल्या त्याआधीच्या दैनंदिन वीजनिर्मितीत दुपटीने वाढ केली आहे.

As the demand for electricity increased, Mahanirmithi doubled its power generation
'पेसा' क्षेत्रात असेपर्यंत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी!

राज्यांत विजेची मागणी वाढताच महानिर्मितीचे तत्पर योगदान

काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने, एरवीच्या शिखर मागणीच्या तुलनेत विजेची मागणी खालावून १६-१७ हजार मेगावॉट झाली होती. परिणामस्वरूप महानिर्मितीचे वीज उत्पादनही सरासरी जेमतेम साडेतीन हजार मेगावॉट इतके झाले होते. तथापि, आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना आपले ब्रीद जपत राज्यातील वीज ग्राहकांना महानिर्मितीने नक्कीच दिलासा दिला आहे.

सद्यःस्थितीत महानिर्मितीचे बहुतांश औष्णिक संच मेरिट ऑर्डर डिस्पॅच तत्त्वानुसार महावितरणच्या शेड्यूलमध्ये असून, आगामी काळात गरज पडल्यास सुमारे दहा हजार मेगावॉट वीजनिर्मितीदेखील साध्य करण्यासाठी महानिर्मिती सज्ज आहे, असे प्रतिपादन महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी केले.

As the demand for electricity increased, Mahanirmithi doubled its power generation
नाशिक : लाचखोर शिक्षणाधिकारीची मालमत्ता वाचून व्हाल थक्क!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com