Nashik : कंगणा राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangna ranaut

कंगणा राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कंगणा राणावतने निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असल्याने तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिकतर्फे करण्यात आली. या वेळी प्रदेश सचिव शदाब सय्यद यांनी आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना निवेदन दिले.

कलाक्षेत्रातील कामगिरीमुळे ८ नोव्हेंबरला अभिनेत्री कंगणा राणावतला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कारानंतर ११ नोव्हेंबरला भारताला १९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वतंत्र २०१४ मध्ये मिळाले असल्याचे तिने निंदनीय वक्तव्य केले. यामुळे संपूर्ण देशात त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली असल्याने देशाच्या स्वातंत्र्याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, टिपू सुलतान यांच्यासह स्वतंत्र सैनिकांचा अपमान झाला आहे.

अभिनेत्री कंगणा राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी संतोष जगताप, रिझवान शेक, असिफ शेख, विकास वानखेडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top