Jal Jeevan Mission Scheme
Jal Jeevan Mission Schemeesakal

Nashik News : सिन्नर तालुक्यातील वावी येथे जल जीवन कामांच्या चौकशीची मागणी

सिन्नर तालुक्यातील वावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर आराखड्याप्रमाणे होत नसून या कामाचा दर्जा निकृष्ट आहे.
Published on

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर आराखड्याप्रमाणे होत नसून या कामाचा दर्जा निकृष्ट आहे.

त्यामुळे सदर कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (Demand for inquiry into jal jeevan mission scheme at vavi in ​​Sinnar taluka Nashik News)

कामाचे अंदाजपत्रक व मंजूर आराखडा मागणी करूनही उपलब्ध करून देण्यात आला नाही. असा आरोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वावी येथील ग्रामस्थांनी केला आहे.

केंद्र शासनाने हर घर जल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जलजीवन मिशन योजना सुरू केली. मात्र वावी ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या निकृष्ट कामांमुळे या योजनेच्या उद्देशाला हरताळ करण्यात आला आहे.

संबंधित कामावर देखरेख ठेवणारे अधिकारी व ठेकेदार यास जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक पातळीवर योजनेसंदर्भात ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घेतली जात नाही. कामाच्या गुणवत्तेबाबत वारंवार सांगूनही सुधारणा होत नाही.

Jal Jeevan Mission Scheme
Nashik PSI Convocation Ceremony : आज घेतलेल्या शपथेचे सदैव स्मरण ठेवा : संजय कुमार

त्यामुळे सदर कामाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून यासंदर्भात योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक वेलजाळी, गणेश वेलजाळी, राकेश आनप, गणेश थोरात, किरण संधान, सुरेश ताजणे, राहुल वेलजाळी, नितीन आनप, अमोल पठाडे, विजय लांडगे, साईनाथ पठाडे, नितीन काळोखे, अनिल आनप, अरुण ताजने, नितीन घेगडमल आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Jal Jeevan Mission Scheme
PSI Convocation Ceremony: पोलीस कॉन्स्टेबल झालो तेव्हाच ‘कॅप’चे पाहिले होते स्वप्न! पैठणचा सलमान झाला पोलीस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com