नाशिकच्या कलिंगडांचा परराज्यात डंका; यंदा किलोचा भाव 11 रुपये

नाशिकच्या युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग परराज्यात पोचलाय.
Watermelon
Watermelonesakal

नाशिक : द्राक्ष, कांदा, टोमॅटो अन् भाजीपाला नाशिकहून परराज्यात मोठ्या प्रमाणावर पाठविला जातो. शेतीत विविध प्रयोग करत मखमलाबादच्या युवा शेतकरी गणेश पिंगळे व सतीश पिंगळे यांनी १ एकर क्षेत्रात कलिंगडाची (Watermelon) लागवड केली असून, या कलिंगडाला उन्हाळा आणि रमजानच्या सणामुळे मोठी मागणी असल्याने कलकत्ता येथे पाठविले जात आहेत.

वेगळ्या पिकाची लागवड करून उत्पन्न वाढविणे शक्य

पिंगळे यांनी आपल्या शेतात द्राक्ष, टॉमेटोही लागवड केले होते. पारंपारिक शेतीबरोबरच आता त्यांनी सिजेंडा कंपनीच्या मॅक्स कलिंगडाच्या वाणाची लागवड केली. १ एकर शेतीत ४००० रोपे लावून ७५ दिवसांत कलिंगडाचे उत्पन्न घेत आहेत. शहरीकरणामुळे मखमलाबाद परिसरात शेती क्षेत्र कमी होते आहे. शेतीत आधुनिक प्रयोग करत ३५ दिवस कलिंगडाच्या या रोपांना क्रॉप कव्हर टाकून झाकले होते. यामुळे फुलांची चांगली वाढ होऊन पिकाचे संरक्षण झाल्याने उत्पन्न मोठ्या प्रमाणार घेतल्याचे त्यांची सांगितले, मात्र पारंपरिक शेती करत युवा शेतकरी पिंगळे बंधूंनी आपल्या एक एकर शेतात कलिंगडाची लागवड करत साधारण २५ टन उत्पादन घेतले आहे. शेती क्षेत्र कमी होत असताना भाजीपाल्यासोबतच वेगळ्या पिकाची लागवड करून उत्पन्न वाढविणे शक्य होते आहे.

Watermelon
नाशिक : कोकणचा राजा 'हापूस' लासलगावमार्गे अमेरिकेला रवाना

चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद

या कलिंगडला गुजराथ, दिल्ली, राजस्थान, कलकत्ता, प. बंगाल या राज्यात मोठी मागणी आहे. नाशिकची द्राक्ष, कांदा, टॉमेटो या पिकांसोबतच आत कलिंगडही परराज्यात जाऊ लागली आहेत. मागील दोन वर्षी कोरोनामुळे उत्पन्न चांगले होऊनही अवघ्या ३ रुपये किलोने कलिंगड विक्री करावे लागल्याने मोठे नुकसान झाले होत. मात्र यंदा कलिंगडला मोठी मागणी असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे.

Watermelon
वणी दरबारात प्रथमच सर्वसामान्य भाविकांच्या हस्ते पंचामृत महापूजा

''शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न काढल्यास चांगला फायदा होऊ शकतो. आम्ही दोघे भाऊ शेती करत आहोत. यापूर्वी परराज्यात द्राक्ष पाठविली आहेतच, आता कलिंगडही पाठवितो आहोत. उन्हाळ्यात पाणी कमी असले तरी चांगले कलिंगडाचे उत्पन्न घेतले तर आर्थिक फायदाही होतो.'' - गणेश पिंगळे, युवा शेतकरी, मखमलाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com