Nashik : सोशल मीडियावर बदनामी करून खंडणीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

social media defamation

Nashik : सोशल मीडियावर बदनामी करून खंडणीची मागणी

नाशिक : फेसबुक हॅक (FB Hack) करून व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे, तसेच सोशल मीडियावरून (Social Media) अश्लील मेसेज पाठवून धमकावण्यासह ४५ लाख रुपये न दिल्यास त्याच्या कार्यालयात पर्सनल मेसेज शेअर करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Demand for ransom by defaming on social media Nashik Cyber Crime News)

हेही वाचा: Nashik : आगामी कुंभमेळा सन 2027 च्या तारखा आखाडा परिषदेकडे सादर

विनोद इरशेट्टी (रा. लक्ष्मीनगर, राणाप्रताप चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, माधुरी ऊर्फ ज्योती विनोद इरशेट्टी (२९), रमेश सोनवणे (५६, रा. पोरबंदर, गुजरात) व एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची पत्नी माधुरी ऊर्फ ज्योती यांच्यात कौटुंबिक कलह आहे. दरम्यान, संशयितांनी विनोद यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या मित्र-नातलगांना बदनामीकारक मेसेज पाठविले. तसेच, रमेश सोनवणे यांनी फिर्यादीकडे ४५ लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक नयन बगाडे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा: सूर्योदय हॉस्पिटलच्या जनरेटर रूमला आग

Web Title: Demand For Ransom By Defaming On Social Media Nashik Cyber Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top