सूर्योदय हॉस्पिटलच्या जनरेटर रूमला आग | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire in the hospital generator room

सूर्योदय हॉस्पिटलच्या जनरेटर रूमला आग

जुने नाशिक : वडाळा नाका येथील सूर्योदय हॉस्पिटलच्या जनरेटर रूमला आग लागून मोठे नुकसान झाले. रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारी घेत काही रुग्णांना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हेही वाचा: महिलेला चेटकीण म्हणत जाळण्याचा प्रयत्न; झोपडीला लावली आग

सूर्योदय हॉस्पिटलच्या जनरेटरला आग लागण्याची घटना बुधवारी (ता.२९) रात्री आठच्या सुमारास घडली. अचानक जनरेटर रूमला आग लागल्याने रुग्णालय प्रशासन कर्मचारी आणि रुग्ण त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरून धावपळ उडाली. अग्निशमन विभागास माहिती मिळताच काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. अर्धा तासात त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवले. जनरेटर रूम हॉस्पिटलच्या खाली असल्याने दुर्घटना टळली.

असे असले तरी आगीचा भडका मोठा असल्याने रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांनी रुग्णांची खबरदारी घेत त्यांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित केले. सुमारे दहा रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. आग बघता रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण त्यांचे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीने उग्र रूप धारण केले असते, तर अन्य भागदेखील आगीच्या कचाट्यात सापडला असता. सुदैवाने जनरेटर रूम खाली होते. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांने वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

हेही वाचा: Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी

Web Title: Fire In Generator Room Of Suryodaya Hospital At Wadala Naka Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikfireHospital