Farmers Protest
sakal
देवळा: मक्याची शासकीय हमीभावाने खरेदी सुरू करावी, कांद्याला अल्प भाव मिळत असल्याने अनुदान जाहीर करावे आणि शेतमालाला योग्य दर मिळावा या मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २४) देवळा बाजार समितीत मोठे आंदोलन केले. सकाळी अकराला तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीत एकत्र येत मक्याचे लिलाव बंद पाडले आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. त्यानंतर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर देवळा-कळवण मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली.