Deola Accident : देवळा-कळवण रस्त्यावर भीषण अपघात; सासू–सून ठार, दोन चिमुकले गंभीर

Two Women from Varvandi Killed in Tragic Evening Crash : देवळा-कळवण रस्त्यावर भऊर फाट्याजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीच्या भीषण धडकेत वरवंडी येथील अनिता विलास शिंदे आणि चेतना अविनाश शिंदे या सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या दोन लहान मुलांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
Accident

Accident

sakal 

Updated on

देवळा: देवळा- कळवण रस्त्यावर भऊर फाट्याजवळ बुधवारी (ता. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मालवाहू वाहन व दुचाकी यामधील भीषण धडकेत वरवंडी (ता. देवळा) येथील सासू-सून ठार, तर त्यांच्या सोबत असलेली दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. या दुःखद घटनेने वरवंडी, तसेच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com