Accident
sakal
देवळा, पिंपळगाव वाखारी: देवळा तालुक्यातील लोहोणेर गावाजवळ साक्री-शिर्डी महामार्गावर आज मंगळवारी सकाळी शाळकरी मुलाला सिमेंट-काँक्रिट घेऊन जाणाऱ्या मिक्सर गाडीने चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. रोशन समाधान आहेर (वय १४, रा. सटवाईचीवाडी) असे मृत मुलाचे नाव असून तो लोहोणेर येथील जनता विद्यालयात आठवीत शिकायचा.