देवळा: खुंटेवाडी ता.देवळा येथील युवा शेतकरी प्रकाश पगार यांच्या डाळिंब बागेतून बुधवार (ता.१३) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डाळिंब फळांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतातून अशा किमती मालाची चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे