House Burglary
sakal
देवळा: वरवंडी (ता. देवळा) येथे चोरलेल्या दुचाकीवरून येत रविवारी (ता.१४) दुपारी घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन ताब्यात तर एकजण फरारी झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ढकांबे (ता.दिंडोरी) येथील अविनाश सानप यांच्या मालकीची हंटर बुलेट दुचाकी ( एमएच-१५ जेई-७१७२) चोरीला गेल्याची तक्रार दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.