Nashik Aadhaar Center : आधार कार्ड काढण्यासाठी हेलपाटे; देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे एकमेव केंद्र कायमस्वरूपी बंद
Deolali Camp Aadhaar Center Remains Closed : आधार सुविधा केंद्र अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. देवळाली कॅम्प परिसरात हे एकमेव केंद्र बंद असल्यामुळे शिंगवेबहुला, संसरी, भगूरसह ग्रामीण भागातील नागरिक तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्डांमधील नागरिकांना आधारकार्ड काढणे अथवा नूतनीकरणासाठी शहराच्या बाहेरील ठिकाणी जावे लागत आहे.
देवळाली कॅम्प: देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल येथे परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आधार सुविधा केंद्र अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.