Army Recruitment
sakal
नाशिक रोड: देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या तीन इन्फंट्री बटालियनसाठी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी (ता. १८) महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजारांहून अधिक तरुणांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुणांचा यात समावेश होता.