नाशिक: देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला येथे जुन्या वादाच्या कुरापतीतून दोन गट समोरासमोर आले असता, त्यांच्यात तुंबळ राडा झाला. यातील एकावर पिस्तुल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगड-विटांचा मारा करण्यात येऊन परिसरामध्ये दहशत माजविली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात २३ संशयितांविरोधात प्राणघातक हल्ल्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करीत सहा संशयितांना अटक केली.