देवळाली कॅम्प: मिनी सिंगापूर म्हणून ओळख असलेल्या देवळाली कॅम्प शहराची बाजारपेठ प्रसिद्ध असून, नाशिक, सिन्नर, इगतपुरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे खरेदीसाठी येतात. त्यातच शहराचे निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन स्थळांमुळे देखील सतत वर्दळ असते. मात्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या बसस्थानकातील पोलिस चौकी आणि वाहतूक पोलिस चौकी गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने एकंदरीत देवळालीकर यांची सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.