देवळाली कॅम्प: नाशिक, सिन्नर आणि इगतपुरी या तीन तालुक्यांना जोडणारा लॅम रोड हा रहदारीचा एकमेव प्रमुख मार्ग आहे. दिवसेंदिवस या रस्त्यावरील वाहतूक वाढत असून, बेलतगव्हाण व संसरी नाका या ठिकाणी सतत कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे संसरी नाका येथे सिग्नल प्रणाली बसविण्याची मागणी नागरिकांसह जनकल्याणी फाउंडेशनच्या सचिव नीता संजय गोडसे यांनी केली. याबाबत पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.