land sale restrictions
sakal
नाशिक रोड: देवळाली विधानसभा मतदारसंघातील विहितगाव, बेलतगव्हाण, मनोली या गावातील देवस्थान जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील निर्बंध उठवण्यात आले आहे. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने या जमिनींवरील व्यवहाराचे निर्बध हटविण्यात आले आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी सोमवार (ता.२९) सह जिल्हा उपनिबंधक यांना पत्रक काढत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.