नाशिक: देवळाली मतदारसंघातील मतदार संख्येबाबत चुकीची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी सीएसडीएसचे राजकीय विश्लेषक संजय कुमार यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच स्वरूपाचा गुन्हा नागपूर येथेही दाखल करण्यात आलेला आहे.