Sakal Exclusive : सांस्कृतिक विभागाला डिजिटायझेशनची प्रतीक्षा; कालबाह्य पद्धतीचा वापर

Department of Cultural Affairs Directorate Awaiting Digitization nashik news
Department of Cultural Affairs Directorate Awaiting Digitization nashik newsesakal

Sakal Exclusive : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होत असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागासाठी हौशी कलावंतांना एका क्लिकवर होणाऱ्या कामासाठी बँक, पोस्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागत असल्याची स्थिती आहे, सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग डिजिटायझेशन कधी होईल याची राज्य शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारे स्पर्धक वाट पाहत आहे. (Department of Cultural Affairs Directorate Awaiting Digitization nashik news)

सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रवेशिका मागविण्याच्या कालबाह्य पद्धतीमुळे स्पर्धेतील हौशी कलावंतांना मुदतीपर्यंत अर्ज न गेल्यास मनस्ताप सहन सहन करण्याची वेळ येते. सांस्कृतिक कार्य संचालनालय आजही पारंपारिक पद्धतीचा अवलंब करत असून कलावंतांना प्रवेशिका पोस्टाने पाठविण्याचे आवाहन केले जाते.

तसेच, प्रवेशिका फी डीडी स्वरूपात मागविली जाते. सेन्सॉर बोर्डाला नाटकाच्या संहिता सेन्सॉर करण्याकरिता जी फी भरावी लागते ती फी सुद्धा डीडी स्वरूपात मागविली जाते. सांस्कृतिक कार्य संचालनालय संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशिका मागविणे, प्रवेशिका फीसाठी यूपीआयचा पर्याय देणे हे शक्य आहे.

मात्र सांस्कृतिक विभागाच्या संकेतस्थळावर स्पर्धेसाठीचे नियम व अटी, नवीन संदेश याव्यतिरिक्त कोणतीच माहिती कलावंतांना उपलब्ध नसते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Department of Cultural Affairs Directorate Awaiting Digitization nashik news
Sakal Exclusive : डान्सरच्या संघर्षाला मिळावा नवा आयाम; नोकरी करून नृत्याचा छंद जोपासताना संघर्ष

प्रवेशिका वेळेत न पोचल्याने तसेच, काही त्रुटी राहिल्यास प्रवेशिका बाद होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुढील स्पर्धांमध्ये डिजिटायझेशन करून विभागाने तांत्रिक बाजूने स्मार्ट होण्याची आवश्यकता असल्याची आशा कलावंतांमध्ये आहे.

सेकंदाचे काम काही दिवसांवर

मराठी रंगभूमीसाठी नवीन संहिता सेन्सॉर करण्यासाठी भरावी लागली फी डीडी स्वरूपात भरावी लागते. तसेच, मुंबईपासून नाशिक- पुणे ही जवळची शहर असल्याने पाठवलेल्या स्क्रिप्ट पुढील तीन दिवसांत पोचू शकतात, लांब असलेल्या शहरांना स्क्रिप्ट पाठवण्याकरिता खूप वेळ लागत असल्याने ई-मेल किंवा पीडीएफ स्वरूपात पाठविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, तसेच, फी ऑनलाइन घेतल्यास काही दिवसांवर लागणारा कालावधी सेकंदावर येण्यास मदत मिळणार आहे. शासनाच्या कामाची व कलावंतांच्या वेळेची बचत होऊ शकते.

"मराठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाला नाटकाच्या संहिता सेन्सॉर करण्याकरिता फी मनी ऑर्डर करावी लागते. सेन्सॉर बोर्डाने खाते नंबर व क्यूआर कोड द्यायला हवा. सेन्सॉर बोर्डाचे एकच कार्यालय मुंबईत आहे, शहरात विविध विभागीय कार्यालय केल्यास रंगकर्मींना सोयीचे होईल." - विनोद राठोड, दिग्दर्शक-प्रकाश योजनाकार

Department of Cultural Affairs Directorate Awaiting Digitization nashik news
CM Eknath Shinde : शिक्षकांना मुख्यालयी राहणेसंदर्भातील अट शिथिल होणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com