Nashik News | कामे वेळेत पूर्ण करावी - छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

नाशिक : कामे वेळेत पूर्ण करावी - छगन भुजबळ

नाशिक : जलसंपदा विभागांतर्गत ज्या कामांसाठी प्रशासकीय मान्यतेसाठी कामांचे प्रस्ताव सादर केल्यास शासन स्तरावर कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित कामांबाबत बैठकीत भुजबळ बोलत होते. जिल्हाधिकारी गंगाथरन्‌ डी., जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, नगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, चांदवडचे प्रांताधिकारी सी. एस. देशमुख, पालखेडचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, सागर शिंदे, सचिन पाटील, नांदूरमध्यमेश्‍वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप, जयदत्त होळकर,मोहन शेलार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री भुजबळ म्हणाले की, जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करतांना तसेच भूसंपादनाचा विषय मार्गी लावतांना शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामे सुरु असलेल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटी द्याव्यात.

गोदावरी डावा कालवा २५ नंबर चारी जऊळके पासून मुखेड पर्यंत स्वतंत्र करावी, गोदावरी कालवा-चारी क्रमांक ३ मुखेडला पाणी मिळत नसल्याने दुरुस्ती करणे, पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसविणे, ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी ४९ किलो मीटरमध्ये एस्केप गेट बसविणे या कामांचा प्रस्ताव तयार करून ही कामे लवकर सुरू करावी अशा सुचना दिल्या.

बैठकीत, दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी ता. चांदवड येथील भूसंपादन, नांदूरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे, रुई, देवगाव,खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नुकसान टाळण्यासाठी देवगाव, रुई, कोळगाव, कानळद (देवगाव) गोदावरी कालवा १५ नंबर व नाला ७ नंबर मोऱ्यापर्यंत खोदकाम करून चर काढणे (पावसाचे पाणी), गोदावरी डावा तट कालवा दुरुस्ती व अंतर्गत कालव्यास अस्तरीकरण अंदाजपत्रकास मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

Web Title: Department Of Water Resources Work Completed Time Chhagan Bhujbal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..