नाशिक- राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महापालिकेच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. २३) सह्याद्री अतिथिगृहात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. बैठकीत सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याचा मुद्दा, स्मार्टसिटी प्रकल्प, तसेच नाशिक पश्चिम विभागातील विविध नागरी समस्यांचा तपशीलवार आढावा घेतला जाणार आहे.