नाशिक- समृद्धी महामार्गावरील आमणे नोड, बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसित होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातून होणारी वाहतूक लक्षात घेता जेएनपीटीए आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गासाठी पर्याय शोधण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे सोमवारी (ता. २८) दिले. या भागातील नाशिक महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.