Nashik News : वादग्रस्त काझी नगररचनाचे उपअभियंता; मंत्र्याचा दबाव असल्याची चर्चा

NMC News
NMC News esakal

Nashik News : महापालिकेच्या बांधकाम विभागात वादग्रस्त ठरलेले व सध्या भुयारी गटार विभागांसह बांधकाम विभागाचा पदभार सांभाळत असलेले उपअभियंता एजाज काझी यांची नगररचना विभागात उपअभियंता पदावर वर्णी लावली आहे. (Deputy Engineer of Controversial officer ejaz Kazi appointed Urban Planning pressure from minister Nashik News)

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सदर नियुक्ती केली असली तरी त्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील एका मंत्र्याचा दबाव असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

महापालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधींचा फारसा संबंध येत नसल्याने सर्व सूत्रे हे वरिष्ठ पातळीवरून फिरविले जातात. त्यामुळेच महापालिकेच्या निवडणुका लांबणीला हेदेखील एक कारण मानले जात आहे.

महापालिके संदर्भातील छोट्या कामासह अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरदेखील नगरसेवकांचे लक्ष असते. परंतु, सध्या प्रशासकीय राजवट असल्याने बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. परंतु वरकरणी बदल्या आयुक्त करत असल्याचे दिसत असले तरी या मागे मंत्र्यांचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NMC News
ZP Smart Villages : जिल्ह्यातील 45 गावे होणार आदर्श; गावांचा कायापालट

मार्च महिन्यात रजेवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या जागी डॉ. कल्पना कुटे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आता नगररचना विभागात उद्धव गांगुर्डे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर भुयारी गटार योजना विभागाचा प्रकल्प व पंचवटी बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज काझी यांची नियुक्ती केली.

नियुक्ती चर्चेत

वास्तविक काझी यांच्याकडे दोन पदभार आहे. भुयारी गटार योजना प्रकल्प अधिकारी पदाचा कार्यभार काढून हेमंत पठ्ठे या उपअभियंताकडे देण्यात आला. काझी यांच्याकडेच आहे, तो पदभार कायम ठेवून अन्य अधिकाऱ्याची नगररचना विभागाच्या उपअभियंता पदावर नियुक्ती करता येणे शक्य होते.

मात्र यापूर्वी सिडको विभागात वादग्रस्त ठरलेल्या एजाज काझी यांच्याकडेच नगररचनाच्या उपअभियंता पदाचा कार्यभार देण्यात आल्याने काझी यांची नियुक्ती चर्चेत आली आहे.

NMC News
Nashik ZP News : वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची धावपळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com