Nashik News : अश्विनीनगर उद्यानाला अवकळा; उद्यान दुरवस्थेकडे प्रशासनाचा काणाडोळा!

Garbage in a park in Ashwininagar.
Garbage in a park in Ashwininagar.esakal

सिडको (जि. नाशिक) : अश्विनीनगर येथील गणपती उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर, वृक्षांची दुरवस्था, नियमित स्वच्छता या समस्यांकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांमधून करण्यात आलेला आहे.

अश्विनीनगर परिसर हा उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. याच परिसरातील गणपती उद्यानाची दुरवस्था झालेली असून, प्रशासन या बाबीकडे लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आलेला आहे. (Desecration of Ashwini Nagar Park administration turned blind eye to plight of park Nashik News)

या उद्यानातच गणपती मंदिर असल्याने येथे अनेक भाविक संपूर्ण परिवारासह दर्शनास येत असतात. उद्यानात खेळणी कमी आणि ग्रीन जिमचे साहित्य जास्त अशी गत झालेली असून यास उद्यान का म्हणावे, असा थेट सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

उद्यानात स्वच्छता नियमित होत नसून पालापाचोळा पडलेला असतो. उद्यानात भटक्या कुत्र्यांचा सर्रास वावर असून, सर्वसामान्य जनतेसाठी बसवण्यात आलेल्या बाकांचा उपयोग इतर लोक झोपण्यासाठी करत असतात.

उद्यानातील कचरा घंटागाडी घेऊन जात नसून, येथे तोडलेल्या वृक्षांची लाकडे आणून ठेवण्यात आली आहे. तर उद्यानातील लॉन्सवर गरजेपेक्षा जास्त पाणी मारल्यामुळे चिखल तयार होतो. पथदीपांची दुरवस्था झालेली असून अनेक पथदीपांच्या तारा उघड्या आहेत, तर सुरक्षा दरवाजेदेखील तुटलेल्या अवस्थेत आहेत.

यामुळे लहान मुले खेळताना या तारांना कधीही स्पर्श करू शकतात. ही वास्तवादी स्थिती नाकारता येण्यासारखी नाही. प्रशासनाला एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतरच जाग येईल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Garbage in a park in Ashwininagar.
Nashik News | निमाची आर्थिक घडी सुरळीत करणार : धनंजय बेळे

दुपारी उद्यानात प्रेमीयुगुल मोठ्या प्रमाणावर ठाण मांडून बसलेले असतात. अनेकदा याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनास कळवूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. उद्यानातील विविध दुरवस्थेबाबत प्रशासनास कळवूनदेखील काहीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे. लवकरात लवकर या उद्यानाची स्थिती सुधारविण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

गणपती उद्यानात

उद्यानात स्वच्छता वेळेवर नाही.
उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर
उद्यानातील बाकड्यांचा झोपण्यासाठी उपयोग
लॉन्सवार गरजेपेक्षा जास्त पाणी
उद्यानात खेळण्यांपेक्षा ग्रीन जिम साहित्य जास्त
पथदीपांच्या तारी उघड्यावर
घंटागाडी कचरा उचलून नेत नाही.

Garbage in a park in Ashwininagar.
Nashik News : चांदवडमधील आशा कर्मचारी महिलेस बेकायदेशीर मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com