Nashik News : चांदवडमधील आशा कर्मचारी महिलेस बेकायदेशीर मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aasha Worker Beating

Nashik News : चांदवडमधील आशा कर्मचारी महिलेस बेकायदेशीर मारहाण

नाशिक : इंद्रायणीवाडी (ता. चांदवड) येथील अंगणवाडी केंद्रातील आशा कर्मचारी रेणुका रघुनाथ तलवारे यांना महिला पोलिसांकडून मारहाण झाल्याची तक्रार संबंधित कर्मचारी तलवारे यांसह आशा व गट प्रवर्तक संघटनेने केली आहे. संबंधित महिला पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे राज्यध्यक्ष राजू देसले, जिल्हा सचिव सुवर्णा मेतकर, रेणुका तलवारे, शिवाजी बर्डे, वैशाली दशपुते, संगीता जाधव, निर्मला पवार, वैशाली कापडणे यांनी याबाबत पोलिस उपअधिक्षिका माधुरी कांगणे यांना तक्रार करत निवेदन दिले आहे.

शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. १२) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांची भेट घेत तक्रार करीत दोषींवर कारवाईची मागणी केली. चांदवड येथे द्वारकाधश हॉस्पिटलमध्ये २८ डिसेंबर २०२२ ला मोबाईलची चोरी झाली. (Illegal beating of Asha employee woman in Chandwad Nashik News)

हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यामध्ये कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या इंद्रायणीवाडी येथील आशा रेणुका तलवारे यांना येथील श्रीमती अहिरे मॅडम यांनी १० जानेवारीला बोलावून घेत, तुम्ही मोबाईल चोरी केली आहे, मोबाईल भरून द्या, अन्यथा तुमची नोकरी जाईल व गुन्हा दाखल कारण्याची धमकी दिली.

या वेळी त्यांना पट्ट्याने मारहाण सुरू केली. रात्री साडेनऊपर्यत मारहाण केली. उद्या सकाळी या, गुन्हा दाखल करते म्हणूनदेखील धमकावले. त्यानंतर ११ जानेवारीला तलवारे यांच्या नातेवाईक व ग्रामस्थ यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत सीसीटीव्ही फुटेज दाखवा, पुरावे द्या अशी मागणी केली असता त्यांना पोलिसांनी उडवाउडवीचे उतर दिले.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Jalgaon News : .वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांचा सफाईबंदचा इशारा

चोरी झाली त्यादिवशी तलवारे रुग्णालयात आली नसल्याचे त्यांना ठामपणे सांगितले, मात्र, पोलिसांकडून दाद मिळाली नाही. पोलिस ठाण्यात दिलेल्या वागणुकीचा आणि मारहाणीचा आयटक संलग्न महाराष्ट्र आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना निषेध करत आहे व अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आहिरे मॅडम यांच्यावर‌ कठोर कारवाई करावी.

घटनेची‌ चौकशी करून व या‌ घटनेची संबंधितावर कारवाई करा; अन्यथा नाशिक जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक एकत्र येऊ तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा‌‌‌‌ इशारा‌ या वेळी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik News : गंगापूर कॅनॉल मध्ये आढळला दुचाकी सह संशयास्पद मृतदेह