

नाशिक : नाशिक ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी शुक्रवारी (ता. २) रात्री अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी अधीक्षक देशमाने यांचे स्वागत केले. (Deshmane new Superintendent of Police of Nashik Rural assumed charge police transfers in maharashtra news)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची मुंबई येथे विशेष शाखेचे पदोन्नतीने उपमहानिरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे.
तर, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिकचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यानुसार, गेल्या गुरुवारीच (ता. १) उमाप यांनी अधीक्षकपदाचा पदभार सोडला होता.
तर, नवीन अधीक्षक देशमाने हे शुक्रवारी (ता. २) रात्री आडगाव येथील नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयात पदभार घेण्यासाठी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडून नवीन अधीक्षक देशमाने यांनी पदभार स्वीकारला.
नवीन अधीक्षक देशमाने हे २०१२-१४ यादरम्यान नाशिक अधीक्षक कार्यालयात उपअधीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक ग्रामीण पोलिसिंगची चांगलीच माहिती आहे. लवकरच ते नाशिक ग्रामीण पोलिसिंगचा आढावा घेण्याची शक्यता आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.