एचआरसीटी स्‍कोर २४, तरी जिद्दीच्‍या जोरावर केली कोरोनावर मात

रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज घेत गृहविलगीकरणात (Home Isolation) डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केला अन्‌ जिद्दीच्‍या जोरावर करंजाड (ता. बागलाण) येथील शकुंतला देवरे यांनी कोरोनावर मात करून दाखविली.
Shakuntala Deore
Shakuntala DeoreSakal

नाशिक : कोरोनाचे (Coronavirus) निदान झाले तेव्‍हा एचआरसीटी स्‍कोर होता सहा. सावधगिरी म्‍हणून नाशिकच्‍या खासगी रुग्‍णालयात हलविले. पण उपचारादरम्‍यान फुफुसाला अधिकच संसर्ग होत एचआरसीटीचा स्‍कोर (HRCT score) पोहचला २४ पर्यंत. रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाणही साठपर्यंत खालावलेले. त्‍यातच रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज घेत गृहविलगीकरणात (Home Isolation) डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केला अन्‌ जिद्दीच्‍या जोरावर करंजाड (ता. बागलाण) येथील शकुंतला देवरे यांनी कोरोनावर मात करून दाखविली. (Despite HRCT score of 24 the woman defeated Corona In nashik)

धुळे जिल्‍हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका असलेल्‍या ५५ वर्षीय शकुंतला देवरे यांना १९ मार्चला कोरोनाचे निदान झाले. नातेवाईक आकाश रवींद्र पगार यांच्‍याशी संपर्क साधत त्‍या नाशिकला उपचारार्थ दाखल झाल्‍या. शहरातील मोठ्या खासगी रुग्‍णालयात त्‍यांना दाखल केले. यावेळी केलेल्‍या एचआरसीटी चाचणीत स्‍कोर सहा आला. साधारणतः पंधरा ते सोळा दिवस खासगी रुग्‍णालयात उपचार केल्‍यानंतरही अपेक्षित सुधारणा होत नव्‍हती. दरम्‍यानच्‍या काळात फुफुसाला अधिकच संसर्ग झाल्‍याने एचआरसीटी स्‍कोर २४ पर्यंत पोहोचल्‍याने गुंतागुंत निर्माण होत चालली होती.

Shakuntala Deore
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या परीक्षांची तारीख ठरली! मंत्री अमित देशमुख यांची माहिती

नातेवाइकांनी रुग्‍णालयातून हलवत गृहविलगीकरणात उपचार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तत्‍पूर्वी डॉ. अतुल वडगावकर यांच्‍याशी संपर्क साधत सल्‍ला घेतला. त्‍यानुसार सौ. देवरे यांना रुग्‍णवाहिकेतून डॉ. वडगावकर यांच्‍याकडे तपासणीला आणले. डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानुसार गृहविलगीकरणात उपचार सुरु केला. औषधोपचाराला गोव्‍यातील डॉ. सुखदेव कुंभार यांच्‍या होमिओपॅथी औषधांची जोड दिली. आठ दिवसांनी केलेल्‍या एचआरसीटी चाचणीत स्‍कोअर २० पर्यंत नियंत्रणात आला. गेल्‍या १० एप्रिलला त्‍यांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. ऑक्‍सिजनची पातळी ९७ पर्यंत पोहचली आहे.

अन्‍य चाचण्यांमुळेही वाढली होती गुंतागुंत

एचआरसीटी स्‍कोअर प्रमाणेच अन्‍य चाचण्यांमध्येही गुंतागुंत वाढलेली होती. सी रिॲक्‍टिव्‍ह प्रोटीन (सीआरपी) १५६ पर्यंत पोहोचला होता. तर एचडीएस चाचणीत ११४२.२ इतकी वाढ झाल्‍याचे आढळले होते. तरीदेखील त्‍यांनी जिद्दीच्‍या जोरावर कोरोनावर मात केली आहे.

(Despite HRCT score of 24 the woman defeated Corona In nashik)

Shakuntala Deore
नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सराईताचा गोंधळ; डॉक्टरांना धक्काबुक्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com