esakal | मोलमजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाला बळ; सावित्रीच्या लेकींची दहावीत भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

success in the ssc examination

मोलमजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाला बळ; सावित्रीच्या लेकींची दहावीत भरारी

sakal_logo
By
प्रकाश बिरारी

कंधाणे (जि. नाशिक) : आर्थिक परिस्थितीने नाजूक व वडील हयात नसलेल्या, मोलमजुरी करणाऱ्या आईने मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले व मुलींनी बाजी मारत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत आईच्या कष्टाला बळ दिले असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. (despite the financial situation girls achieved success in the ssc examination)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद, तसेच शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण वळणावरील इयत्ता दहावीचे वर्ष, अभ्यास कसा करायचा, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन कसा घ्यायचा, असे अनेक प्रश्‍न असताना प्रतिकूल परिस्थितीत येथील रामगीरबाबा जनता विद्यालयातील श्‍वेता पवार (अनुसूचित जमाती) ८७ टक्के व नवे निरपूर येथील जनता विद्यालयात शिकणारी रोहिणी पवार (अनुसूचित जाती) ८५ टक्के गुण मिळविले. या आदिवासी प्रवर्गातील मुलींनी रात्रंदिवस अभ्यास केला.

हेही वाचा: मोबाईल नसतानाही सुनयना विद्यालयात तिसरी; बिकट परिस्थितीतून मिळवले यश

वेळप्रसंगी मोलमजुरी करणाऱ्या आईसोबत मजुरीला गेल्या व पैसे साठवून ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल फोन खरेदी करून शिक्षणप्रक्रिया अखंडितपणे सुरू ठेवली. विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल श्‍वेता व रोहिणी या दोन्ही मुलींच्या आईंच्या कष्टाला बळ मिळाले असून, निकाल समजताच मायलेकींच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

(despite the financial situation girls achieved success in the ssc examination)

हेही वाचा: राज ठाकरे आश्वासक नेते; त्यांची पन्नास भाषणे ऐकणार : चंद्रकांत पाटील

loading image