महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागांमध्ये विकासकामांचा धडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग १४ मध्ये सुरू असलेले रस्त्याचे काम
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागात विकासकामांचा धडाका

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागात विकासकामांचा धडाका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागांमध्ये विकास कामाचा धडाका सुरू आहे. रस्ते ड्रेनेज पाइप-लाइन, असे विविध कामे करून मतदारांवर छाप पाडण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिका निवडणुकीस पाच वर्ष पूर्ण होत आहे. कोरोना प्रादुर्भावाचे दीड वर्ष सोडल्यास तर अन्य साडेतीन वर्षात प्रभागांमध्ये कुठल्याही प्रकारचे काम होताना दिसून आले नाही.

गेल्या पंचवार्षिकची मुदत तीन ते चार महिन्यात संपत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने विद्यमान नगरसेवक कामाला लागले आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेणे, आनंद सोहळ्यात सहभागी होणे, प्रभागातील विविध विकास कामे करणे तसेच मतदारांकडून आलेल्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे, असे प्रकार केले जात आहे.

हेही वाचा: जळगाव : दीडशतकी परंपरेचा श्रीराम रथोत्सव आज

आगामी निवडणुकीत कामाची पावती म्हणून मतदारांना दाखविण्यासाठी प्रभागातील विविध प्रकारचे विकास कामे केली जात आहे. त्यामुळे अनेक प्रभागात विकासकामांचा जणू धडाका सुरू आहे. या कामाच्या पावतीतून निवडणूक लढविणे सोयीचे होणार असल्याचे विद्यमान नगरसेवकांना वाटत आहे. त्यानिमित्ताने निवडणुकांना अवघ्या तीन ते चार महिने अवकाश असताना अचानक सर्वत्र विकास कामांचा जोर सुरू झाला आहे. विकास कामांच्या सुरवातीपूर्वी विविध पक्षांचे मान्यवर प्रभागातील नागरिक यांच्याहस्ते भूमिपूजन करत कामांची प्रत्यक्षात सुरवात केली जात आहे.

रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे, ड्रेनेज पाइपलाइन टाकणे, पिण्याचे पाइपलाइन नवीन बसविणे, पथदीप बसविणे अशा विविध प्रकारची कामे केली जात आहे. गेली साडेतीन वर्ष जी विकास कामे झाली नाहीत, ती केली जात असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय आगामी निवडणुकीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. कारण कुठलेही असू देत प्रभागाचा विकास होत आहे, ही समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया परिसरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top