नाशिक रोड: जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत, म्हणून कुठलीही विकासकामे थांबलेली वा रखडलेली नाहीत. पालकमंत्रिपदाबाबत होईल तो निर्णय मान्य असेल, असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिले. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.