esakal | मंत्र्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये - देवेंद्र फडणवीस

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis
मंत्र्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये - देवेंद्र फडणवीस
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : केंद्राने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला दिला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती क्रिटीकल असून जिल्ह्याला रेमडेसिव्हिरचा मर्यादीत पुरवठा होत आहे, तो वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले. फडणवीस यांनी आज (दि.३०) जिल्हा रुग्णालयाला भेट दिली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले की, जेथे बलशाली नेते तिथे ऑक्सिजन, जिथे बलशाली नेते तिथे रेमडेसिव्हिर अशी परिस्थिती असू नये. उलट रुग्णांच्या संख्येनुसार ही व्यवस्था केली पाहिजे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे हे खरे असले तरी मंत्र्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये असे फडणवीस यांनी सुनावले.

फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सीजन वर एमायडिसी वर इंजेक्शन मिळाले आहे त्यामुळे सर्वत्र समान वाटप झाले पाहिजे ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे त्याचे अधिक साठा मिळवा असे फडणवीस म्हणाले. लवकरच जिंदाल कंपनीकडून एक तर रिलायन्स कंपनीकडून दोन ऑक्सिजनचे टॅंकर नाशिक साठी उपलब्ध करून देण्याचे फडणवीस यांनी आश्वासन यावेळी दिले.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

केंद्राकडे बोट दाखवू नये

राज्य सरकारने वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये, जनतेच्या पाठीशी उभे राहावे या मताचा मी असून आपल्याकडे उबलब्ध साधनांचा योग्य प्रमाणात वापर व्हावा असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.माझ्या परीने जे करता येईल ते मी करतो आहे, कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केलं आहे. राज्यानेसुद्धा तसेच नियोजन करावे. महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन मिळाला आहे. पीएम केअर फंडातून नाशिकला चार ऑक्सिजन प्लंट उभारले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

हेही वाचा: टार्गेट लसीकरण : लसीच्या उपलब्धतेवर ठरणार लसीकरणाची गती