Devendra Fadanvis | अंतर्मनात शिरल्यास ठाकरेंना उत्तरे मिळतील : फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

नाशिक : उद्धव ठाकरे यांना आरोप करण्याची सवय आहे, परंतु इतरांवर आरोप करताना स्वतःच्या अंतर्मनात शिरून पाहिल्यास त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १०) येथे केला. (Devendra Fadnavis statement about uddhav Thackeray Nashik news)

Devendra Fadnavis
Nashik : अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या जखमी; वनरक्षकावर हल्ला

भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी नाशिकमध्ये आले असता ते माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांनी देशातील केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर पाळीव प्राण्यांप्रमाणे होत असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, की ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगवासाची तुलना लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी केली, यावर उत्तर देताना फडणवीस यांनी यावर ‘मी फक्त स्मित हास्य देईल’ असे मार्मिक उत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देताना सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिकमंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातूनच प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ब्रिटनमध्ये असलेली तलवार व आमच्या उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेली तलवार या दोन्ही तलवारी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, एवढेच आपण पाहिले पाहिजे. जे जे आपल्याकडून नेले ते आपण आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्यातून यात्रा सुरक्षित जाईल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आली आहे. नांदेड येथे गुरुवारी जाहीर सभा झाली, या यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रात कुठली यात्रा आली तरी तिला संरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. काँग्रेसची यात्रा महाराष्ट्रातून सुरक्षित जाईल, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. यात्रेला प्रतिसाद मिळाला की नाही, हे यात्रा संपल्यानंतरच कळेल.

Devendra Fadnavis
Nashik : रामकुंड नव्हे... रामतीर्थ!; पांडव लेण्यांतील शिलालेखात ‘रामतीर्थ’ असा उल्लेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com