देवगाव: एका क्षणाचा विलंबही जिवावर बेतू शकला असता... पण देवगावच्या १६ वर्षीय ओम सुहास सोनवणे याच्यासाठी आरोग्य यंत्रणा मिनिटामिनिटाशी शर्यत करत धावली आणि मृत्यूच्या दारातून त्याला परत आणले. उजव्या पायाच्या बोटावर इंडियन कोब्रा या अतिविषारी सर्पाने दंश केल्यानंतर केवळ अचूक निर्णय, वेळेवर औषधोपचार आणि सलग ६५ किमीचा वेगवान वैद्यकीय प्रवास यामुळेच त्याचा जीव वाचला.