ST Bus Accident
sakal
नाशिक
ST Bus Accident : कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नव्हते; बस पलटी होण्यामागे निष्काळजीपणा कारणीभूत?
ST Bus Overturns Near Bhavde Phata on Nashik-Nandurbar Highway : विंचूर-प्रकाशा महामार्गावर भावडे फाट्यानजीक साक्री आगाराची नाशिक-नंदुरबार एस.टी. बस पलटी झाली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले. अपघाताच्या ठिकाणी महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असताना योग्य फलक नसल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
देवळा: विंचूर- प्रकाशा (७५२ जी) महामार्गावर शुक्रवारी (ता. १४) साक्री आगाराची नाशिक- नंदुरबार एस. टी. बस भावडे फाट्यानजीक पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. बसमधील ३६ प्रवाशांपैकी सहा प्रवासी जखमी झाले असून, उर्वरितांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
