देवळा: कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा पाठलाग करुन आणि देवळ-मालेगाव मार्गावरील धोबीघाट शिवारात आठ जनावरांची सुटका केली. या कारवाईत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.