Nashik Crime : चोरीसाठी महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव; नाशिक जिल्हा न्यायालयाने आरोपीला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
Background of the Nashik Devlaga Murder Case : देवळा तालुक्यातील देवपूरपाडा येथे चोरीच्या इराद्याने जिजाबाई विजय जोंधळे यांचा कुऱ्हाडीने खून करणाऱ्या आरोपी अंकलेश अरुण गांगुर्डे याला नाशिक जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नाशिक: देवपूरपाडा (ता. देवळा) येथील चोरीसाठी गेलेल्या आरोपीने झोपलेल्या महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत खून केला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.