Daughter-in-Law Murders Bedridden Mother-in-Law in Deolali Camp
Sakal
नाशिक: नातेसंबंधाला काळिमा फासणारी घटना देवळाली कॅम्प येथे घडली असून, अंथरुणाला खिळलेल्या ८९ वर्षांच्या सासूचा सुनेने खून केला. मृत्युमुखी पडलेल्या सासूला सुनेनेच रुग्णालयात दाखल केले. मात्र, विच्छेदन अहवालात गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने सुनेविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.