Renukamata Yatra
sakal
देवळाली कॅम्प: भगूर येथील रेणुकामाता देवीची यात्रा २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि लष्करी प्रशासनाच्या बंदिस्त धोरणामुळे भाविकांना मोठी गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.