Nashik News : सप्तशृंगी गडावर भाविकांच्या गाडीला अपघात; 25 हुन अधिक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental Vehicle

Nashik News : सप्तशृंगी गडावर भाविकांच्या गाडीला अपघात; 25 हुन अधिक जखमी

वणी (जि. नाशिक) : सप्तशृंग गडावरील दरडोई कर वसुली नाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर दाभाडी, ता. मालेगाव येथुन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिकअप पलटी होवून 32 प्रवासी जखमी झाले असुन चार भाविकांवर नांदुरी येथे, उपचार सुरु आहेत तर उर्वरीत यांचेवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Devotees car accident at Vani more than 25 injured Nashik News)

मंगळवार देवीचा वार अशी मान्यता असल्याने मंगळवारी सप्तशृंगीरणी हजारो भाविक लीन होतात.आज मंगळवारी सकाळच्या,सुमारास दाभाडी येथील बंडु गांगुर्डे याच्या पिकअप क्रमांक MH 18- BZ -8167 या क्रमांकाच्या पिकअप मधुन सदर भाविक सप्तशृंग गडावर दर्शनासाठी जात होते.

नांदुरी ते सप्तशृंगगड हे अंतर दहा किलोमीटर असुन सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व सदर पिकअप पलटल्याने भाविकांनी आक्रोश केला.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: Nashik Crime News : कामगारानेच फोडले Sagar Sweets! 22 लाखांची रोकड जप्त

गडावरील नागरीक ,सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली काही जखमीना नांदुरी येथे दाखल केले. तर उर्वरीत यांना रुग्णवाहिकेद्वारे, वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान मालवाहु वाहनामधे प्रवासी भाविक एवढ्या संख्येने आसताना नांदुरी येथील तपासणी करणारांनी हे वाहन सोडले कसे दरम्यान वणीग्रामीण रुग्णालयात 23 जखामीना दाखल केले आहे.

हेही वाचा: Nashik News : नाशिक रोडला माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लाकूडतोडे सक्रिय

टॅग्स :WaniNashikaccident