Nashik Kalika Devi Yatra: पावसाने कालिकादेवी यात्रोत्सवात भाविकांचा हिरमोड

Nashik Kalikadevi Yatra
Nashik Kalikadevi Yatraesakal
Updated on

Nashik Kalikadevi Yatra : श्री कालिका देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी (ता.१७) महिलांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. यात्रोत्सव रंगात आलेला असतानाच सायंकाळी सुरू झालेल्या परतीच्या पावसाने व्यावसायिकांसह भाविकांचा काहीकाळ हिरमोड झाला.

दरम्यान, विनाशकारी प्लास्टिकला पर्याय म्हणून श्री कालिका देवस्थान व बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे भाविकांना पंचवीस हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. (Devotees flock to Kalikadevi Yatra due to rain nashik)

दिवसभर निरभ्र राहिलेल्या आकाशात सायंकाळी ढग दाटून आले अन्‌ सहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. पावसाने श्री कालिका यात्रोत्सवातील भाविकांसह व्यावसायिकांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली.

देवी दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना त्यामुळे तात्पुरता आसरा शोधावा लागला. मात्र काही वेळाने पावसाने उघडिप दिली. तत्पूर्वी दर्शनासाठी आलेल्या महिलांनी देवी मंदिराजवळ गटागटाने सेल्फीचा आनंद लुटला.

मंदिराच्या आवारात मांडलेल्या प्रसादाच्या स्टॉल्सलाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यात्रेनिमित्त दाखल झालेल्या रहाट पाळण्यांसह इतर खेळणीलाही दोन दिवसांपेक्षा मंगळवारी अधिक प्रतिसाद मिळाल्याचे गर्दीवरून दिसून आले.

तिसऱ्या माळेला भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे व फ्रावशी अकादमीचे रतन लथ यांच्या हस्ते सकाळी सपत्निक आरती व पूजा झाली. भविकांच्या आग्रहास्तव यंदा मंदिर चोवीस तास खुले ठेवले जात असून त्यास चांगला प्रतिसादही मिळत आहे.

Nashik Kalikadevi Yatra
Navratri 2023 : दुर्गेची शक्तिपीठे का निर्माण झाली? ती फक्त भारतातच आहेत का?

यात्रेनिमित्त मराठा महासंघ व अर्पण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरातून आज सायंकाळपर्यंत शंभरपेक्षा अधिक बाटल्यांचे रक्त संकलन झाल्याचे आयोजकांनी सांगितले. हे शिबिर कोजागरीपर्यंत सुरू राहणार आहे.

जागरण गोंधळाने रंगत

श्री कालिका देवस्थानतर्फे यंदा प्रथमच रात्री बारा ते पहाटे चारदरम्यान जागरण- गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्जुन गोंधळी व त्यांचे पथक ही कला सादर करत असून या जागरण गोंधळालाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक हौशी भाविक या गोंधळींबरोबर सेल्फीचाही आनंद घेत आहेत.

Nashik Kalikadevi Yatra
Navratri Festival 2023: कसमादेत उद्यापासून चक्रपुजेस प्रारंभ; गावागावात उत्साह, जय्यत तयारी सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com