Devyani Pharande
sakal
नाशिक: महापालिकेच्या मोक्याच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसकांना देण्याच्या प्रस्तावाला आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोध केला आहे. शहरातील सार्वजनिक जागा खासगीकरणाच्या विळख्यात जाण्याची शक्यता असल्याने हा निर्णय जनहिताविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आमदार फरांदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत बीओटी प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली.