Nashik News : शिक्षकांचे पगार रखडले! मुख्याध्यापक संघ आक्रमक, नूतन वेतन अधीक्षकांकडे मागण्यांचा पाढा

Nashik Teachers Face Financial Hardship Due to Delayed January Salaries : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक वेतनपथक कार्यालयात वेतन अधीक्षक प्रीती पाटील-पवार यांची भेट घेऊन जानेवारी वेतन व प्रलंबित बिलांबाबत निवेदन दिले.
teachers salary delay

teachers salary delay

sakal 

Updated on

डीजीपीनगर: वेतन अधीक्षकांच्या बदलीमुळे जानेवारी महिन्याचे वेतन उशिरा झाल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच प्रलंबित वैद्यकीय बिले, रजा रोखीकरण, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी बिले तसेच पुरवणी फरक बिले त्वरित अदा करण्यात यावीत, अशी ठाम मागणी पदाधिकाऱ्यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com