Dhanashree Shinde
sakal
सिन्नर: येथील महिला सायकलपटू धनश्री शिंदे यांनी अवघ्या २१ दिवसांत चार प्रदीर्घ अंतराच्या सायकल धावा पूर्ण करून प्रतिष्ठेचा सुपर रँडोनर हा मान पटकावला आहे. वर्षभरात चारही धावा पूर्ण करण्याची अट असताना धनश्री यांनी ती केवळ तीन आठवड्यांत पार पाडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.