धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H32242
धुळे : धनगर आरक्षणप्रश्नी धुळ्यातील महामोर्चाबाबात पत्रकार परिषदेत माहिती देतांना दीपक बोराडे. शेजारी इतर मान्यवर.
---
धनगर आरक्षणप्रश्नी आता आरपारची लढाई
---
दीपक बोराडे : धुळ्यात १५ ऑक्टोबरला महामोर्चा; समाजाला आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : संविधानानुसार धनगर समाजाचा अनुसुचीत जमातीमध्ये समावेश आहे. मात्र, समाजाच्या अशिक्षीत व अज्ञानाचा गैरफायदा घेवून त्यांना लाभापासून वंचीत ठेवण्यात येत आहे, याप्रश्नी सरकार चालढकल करत आहे, असा आरोप करत आता आरक्षणासाठी आरपारकी लढाई लढण्यास सज्ज आहोत. या पार्श्वभूमीवर धनगर समाजाला जागरुक करण्यासाठी आणि सरकारला इशारा देण्यासाठी धुळ्यात १५ ऑक्टोबरला महामोर्चा आणि महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी दिली.
-----------
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात श्री. बाराडे यांची यासंदर्भात पत्रकार परिषद झाली. या वेळी सुनील वाघ, मनोज गर्दे, पंडीत मदणे, लखन गोराड, गणेश गर्दे, अण्णा खेमनर, श्री. पाकळे, गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बोराडे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राजकीय नेत्यांनी समाजाला आजपर्यंत झुलविण्याचे काम केले आहे. आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी उपोषण केले, बलिदान दिले. तरीदेखील सरकार याप्रकरणात कार्यवाही करत नसल्याने समाज आता आरपार की लढाईच्या भुमिकेत आला आहे. एसटी आरक्षणाबाबत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासने दिली. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही.
सरकारला इशारा
१५ ऑक्टोबरचा धुळ्यातील उत्तर महाराष्ट्र स्तरावरचा महामेळावा हा समाज जागृतीचा मेळावा आहे. त्याबरोबरच सरकारसाठी इशारा मेळावाही आहे. त्यामुळे सरकारने लवकरच बैठक घेवून धनगरांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे, अन्यथा जेव्हा आम्ही मुंबईत धडक घेवू तेव्हा गर्दीचे सारे रेकॉर्ड मोडले जातील. गरज पडली तर दिल्लीतही धडक देवू, असा इशारा बोराडे यांनी दिला.
महामोर्चाचा मार्ग असा
धुळ्यातील महामोर्चाला सकाळी अकराला मनेाहर टॉकीजजवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून सुरुवात होईल. आग्रारोडमार्गे महापालिकेची जुनी इमारत आणि तेथून क्युमाईन क्लब येथे मोर्चा येईल. या ठिकाणी महामेळावा होईल.
---