फोटो : H34666
नाशिक : ‘मयूर अलंकार’ दालनात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झालेली गर्दी.
--
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर
‘मयूर अलंकार’मध्ये गर्दी
नाशिक, ता. ६ : प्रसिद्ध सराफ व्यावसायिक ‘मयूर अलंकार’ तर्फे दसरा आणि दिवाळीनिमित्त सर्व प्रकारच्या दागिन्यांच्या घडणावळीवर केवळ ८.९९ टक्के असा सवलतीचा दर जाहीर करण्यात आला आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मयूर अलंकारच्या चारही शोरूम्समध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
सणासुदीच्या दिवसांसह आगामी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता मयूर अलंकारने सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये पारंपरिक श्रीमंत पेशवाई दागिन्यांसह टेम्पल, टर्की आणि कलकत्ती पॅटर्नमधील राणीहार, बकुळी हार, लक्ष्मीहार, आकर्षक नेकलेस, विविध डिझाईन्सची मंगळसूत्रे आणि चेन्स यांसारख्या विविध अलंकारांचा समावेश आहे. तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ‘लिओरा प्रीमियम’ या ब्रँडचे डायमंड कलेक्शन, तर पुरुषांसाठी ‘अदा कलेक्शन’अंतर्गत फॅन्सी कडे, बाळी, होलो चेन आणि ब्रेसलेट अशा आधुनिक डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सराफ बाजार, गंगापूर रोड, तपोवन लिंक रोड आणि काठे गल्ली येथील मयूर अलंकारच्या कोणत्याही शोरूमला भेट देऊन ग्राहकांनी जुने दागिने बदलून नवीन दागिने घेण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालकांनी केले आहे.