
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकांची तयारी जोमात सुरू आहे. यंदा दोन वर्षानंतर होणाऱ्या मिरवणुकीमुळे सर्व ढोल पथकांचा उत्साह शिगेला आहे. ढोल पथके गेल्या एक महिन्यापासून तयारीला लागली आहे.
अंतिम टप्प्यात तयारीला जोर आला असून, सध्या पावसाची शक्यता पाहता ढोलला प्लॅस्टिक कोटिंग करणे अनिवार्य असल्याचे रामनगरी वाद्य पथकाने सांगितले. (dhol pathak ready for soulful musical farewell to ganeshotsav 2022 Nashik Latest Marathi News)
गुरुवारी (ता. ८) रात्री उशिरापर्यंत ढोलला प्लॅस्टिक रॅप करण्याचे काम सुरू राहील, तसेच ढोलची स्थिती तपासून त्याला ताण देण्यात येतो. ढोल हे तीन प्रकारचे असतात. चामडी ढोलसाठी मेंटेनन्स जरा खर्चिक आहे. रामनगरी ढोल पथकात चामडी ढोलचा वापर केला जातो. तसेच दमट हवामानामुळे चामडी ढोलला गरम वाफ देवून ताणून घेतले जाते.
तसेच, ढोलच्या बूबूळला आतल्या बाजूने मसाला लावला जातो. पावसामुळे संरक्षण म्हणून प्लॅस्टिक रॅपही केले जाते. गुलालवाडी, शिवतीर्थ, विघ्नहरण, शिवराय, सहस्त्रनाद, शिवसाम्राज्य, शिवसंस्कृती, शिवकाल, शिवनाद, नटनाद माऊली आदी वाद्य पथकांची तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी पथके सज्ज झाली आहेत.
ढोल वादयाचे प्रकार
पहिला हात, दुसरा हात, तिसरा हात, चौथा हात, सहावा हात, आदी, तसेच शिवस्तुती, एक ठोका, तीन ठोका, रामलखन या वाद्य प्रकारात ढोलचे ताल बसविले जातात. तसेच प्रत्येक ढोल पथक स्वतंत्र ताल तयार करून त्याचा सराव करत असतो. तसेच पारंपारिक हात प्रकार हे सर्व ढोल पथकांचे आकर्षण आहे.
त्यात पहिला हात हा सर्व ढोल पथकाचा आवडता ताल आहे. तसेच ढोल पथकाबरोबरच लेझीम, झांज पथकही सज्ज झाले आहेत. यात ध्वज, झांज, ढोल यासाठी ग्रुपचे रोटेशन केले जाते. यामुळे प्रत्येकाची एनर्जीही आळीपाळीने वापरली गेल्याने फायद्याचे होते.
तसेच मिरवणुकीसाठी ढोल पथक सदस्यांसाठी संत्री ज्यूस, लेमलेट गोळ्या, तसेच स्नॅक्स आदीची सोय पथकाकडून करण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीत सामील मंडळेही मोक्याच्या ठिकाणी पाणी स्नॅक्स हे ढोल पथकासाठी उपलब्ध करून देत असतात.
"२०१७ मध्ये मुंबईला गणेश आगमन मिरवणुकीसाठी नाशिकहून रामनगरी पथक दाखल झाले होते. विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. चामडी ढोल असल्याने पावसाची शक्यता लक्षात घेता प्लॅस्टिक रॅपिंगचे काम सुरू आहे, हे काम रात्री उशिरापर्यंत चालले." - अथर्व शिवदेकर, रामनगरी ढोल पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.