Ganeshotsav 2023: ढोल- ताशांचा निनाद गुंजणार! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरावास प्रारंभ

The slogan of the drum and tasha teams will resound
The slogan of the drum and tasha teams will resoundesakal

Ganeshotsav 2023 : देशभर नव्हे जगभर नाशिकच्या ढोल वादनाची चर्चा सोशल माध्यमावर असते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नाशिकचे ढोल पथकेही सज्ज झाली असून, गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांचा निनाद गुंजणार आहे.

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने ढोल-ताशा पथकांसह व्यावसायिकांची लगबग वाढली आहे. पथकांच्या सरावास प्रारंभ झाला असून, पथकांनी ढोल-ताशा दुरुस्तीस प्राधान्य दिले आहे.

नवीन पथकांचीही यंदा भर पडणार असून, विविध प्रकारच्या साहित्य खरेदीसह प्राधान्य दिले जात आहे. (dhol Tashas will resound Practicing started in background of Ganeshotsav 2023 nashik news)

गणेशोत्सव जवळ आल्यावर ढोल-ताशांच्या लागणाऱ्या पानांची जुळवाजुळव व्यावसायिकांकडून केली जात आहे. बागलाण तालुक्यापासून त्र्यंबकेश्वर, पालघर, जव्हारपर्यंत नाशिकमधील ढोल-ताशांची मागणी आहे.

नाशिक जिल्ह्यात नवीन ढोल पथकांकडून ढोल-ताशांची पाने आणि पिंपांसह तयार असलेल्या ढोल-ताशाला मागणी आहे. ढोल-ताशा पथकांकडून महिन्यापूर्वीच मागणी सुरू होते. त्यानंतर सरावास प्रारंभ होतो.

गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांचा निनाद ऐकायला मिळणार आहे. ढोल-ताशा निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांनीही महिनाभरापूर्वीच तयारी सुरू केली होती. अडीच वर्षांनंतर यंदा ढोल-ताशांच्या व्यवसायाला प्रतिसाद आहे.

त्यामुळे गत तीन वर्षांपासून मंदी असलेल्या व्यवसायातून उभारी मिळणार असल्याचे चित्र आहे. नाशिकमधील पथकांकडून पुणेरी ढोलाच्या साहित्य खरेदीसही प्राधान्य दिले जात आहे.

संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न

पथकामध्ये तरुण-तरुणी डॉक्टर, वकील, सरकारी कर्मचारी, व्यावसायिकांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवजन्मोत्सव तसेच, गणेशोत्सव काळात पथक संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

एका पथकांत ८० ते ९० तरुण तरुणी, व महिला तसेच, दीडशे मुले व पुरुष असे दोनशेहून अधिक जणांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The slogan of the drum and tasha teams will resound
Ganeshotsav 2023: यंदा गणेशोत्सव 19 दिवस उशीरा; मूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची लगबग

पथकांकडून दुरुस्तीला प्राधान्य

नाशिकमधील पथकांनी गत महिन्यापासून दुरुस्तीसाठी व्यावसायिकांकडे गर्दी केली आहे. ढोलला जोडी, तांबडी, फायबरची पाने तसेच, ताशात मेन, काड्यांचा समावेश असतो. या वस्तू दुरुस्ती करण्यात व्यावसायिक मग्न आहेत.

नाशिकमधील ढोल पथकांनी सरावास प्रारंभ केल्यानंतर व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, ग्रामीण भागातील ढोल पथकांकडूनही साहित्य खरेदीसह दुरुस्तीला प्राधान्य दिले जात आहे.

पथकांना दुरुस्तीला साधारण पाचशे ते हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. तसेच, नवीन ढोलाच्या किमती दोन हजार ५०० ते पाचशे रुपयांपर्यंत आहेत. ताशांच्या किमती साडेपाचशेपासून हजारपर्यंत असल्याचे ढोल-ताशा व्यावसायिकांनी सांगितले.

"ढोल पथकांचे गत दोन महिन्यांपासून दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. नव्या पथकांकडून नवीन साहित्य खरेदीसही गर्दी असून बागलाण, त्र्यंबक, जव्हार, पालघर येथून मागणी आहे. यंदा ढोल-ताशा पथकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे."

- गौरव सोनवणे, ढोल-ताशा व्यावसायिक

"ढोल वादक आपला छंद जोपासण्यासाठी तसेच, संस्कृती टिकविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. पथकाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा, ध्वज, झांज टोल, अशा सर्व वाद्यांची वादक सराव करत आहेत."- कुणाल अहिरे, नटनाथ ढोल-पथक

The slogan of the drum and tasha teams will resound
Ganeshotsav : चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर! गणेशोत्सवासाठी मुंबईतून 2 हजार, तर रत्नागिरीतून 1 हजार 550 गाड्यांचं नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com