Ganeshotsav : चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर! गणेशोत्सवासाठी मुंबईतून 2 हजार, तर रत्नागिरीतून 1 हजार 550 गाड्यांचं नियोजन

'प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबईतून २ हजार २०० जादा गाड्या सोडण्यात येणार'
Ganeshotsav ST Bus Ratnagiri Mumbai
Ganeshotsav ST Bus Ratnagiri Mumbaiesakal
Summary

परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून १ हजार ५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

Ratnagiri News : कोकणात गणेशोत्सव (Konkan Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. या कालावधीत लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबईतून २ हजार २०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून १ हजार ५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे, अशी माहिती एसटीचे (ST Bus) विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. माळनाका येथील विभागिय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

Ganeshotsav ST Bus Ratnagiri Mumbai
Loksabha Election News: राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी घोषणा

ते म्हणाले, रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर, पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगच्या बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानक तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल अॅपव्दारे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणही करता येईल.

Ganeshotsav ST Bus Ratnagiri Mumbai
ठरलं! महादेव जानकर CM योगींच्या राज्यातून लढवणार लोकसभा निवडणूक? 'या' मतदारसंघातूनही आजमावणार नशीब

प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने १५ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. २३ पासून परतीसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. परतीसाठी २७९ गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. दापोली आगारातून २००, खेड १५०, चिपळूण २३०, गुहागर २६०, देवरूख १८०, रत्नागिरी १५०, लांजा १३०, राजापूर १७०, मंडणगड आगारातून ८० मिळून, अशा एकूण १५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

Ganeshotsav ST Bus Ratnagiri Mumbai
Malvan : कोकणात सापडला आणखी एक 'ऐतिहासिक खजिना'; लांबलचक सड्यावर आढळल्या कातळशिल्पांच्या पाऊलखुणा!

ग्रुप बुकिंग केल्यास गाडी थेट गावात

प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावातून थेट बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी गावागावांतील सरंपचांशी संपर्क साधून ग्रुप बुकिंग सुविधेबद्दल माहिती दिली जाणार आहे. दापोली आगारातून ५८, खेड ४४, चिपळूण ५७, गुहागर २६, देवरूख १५, रत्नागिरी १५, रत्नागिरी २०, लांजा ८, राजापूर ३७, मंडणगड आगारातून १४ मिळून विभागातून एकूण २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध एसटीच्या जादा गाड्यांच्या सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com