मतदार नोंदणी शिबिरे

मतदार नोंदणी शिबिरे
Published on: 
धुळे टुडे १ साठी... --- धुळे जिल्ह्यात आज, उद्या विशेष मतदार नोंदणी शिबिरे --- पात्र युवक- युवतींनी शिबिरांचा लाभ घ्यावा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : जिल्ह्यात शनिवार (ता.२४) व रविवार (ता. २५) ला विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील नावांची पडताळणी आणि दुरुस्तीसाठी ही शिबिरे घेण्यात आली आहेत. पात्र युवक- युवतींनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत दिली आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ ला प्रसिद्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांना आणि नवमतदारांना मतदार यादीविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर ही विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. २४ व २५ ऑक्टोबरला प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) शिबिरांचे आयोजन करतील. या शिबिरांमध्ये नवमतदार नोंदणीबरोबरच मतदार यादीतील नावांची पडताळणी, दुरुस्ती तसेच आवश्यक अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com